सडक अर्जुनी, दि.२१
जातीयवाद हा अभिशाप असून, विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला जातिविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे,स्वातंत्र्यानंतर भारताच्या शेजारील अनेक राष्ट्रांमध्ये लोकशाही रुजली नाही. परंतु, भारत सातत्याने लोकशाही मार्गावर चालत आला, याचे श्रेय डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला जाते, असे प्रतिपादन माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद चंद्रिकापुरे यांनी केले.
कणेरी मनेरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 एप्रिल 2025 ला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार इंजिनिअर राजकुमार बडोले, प्रामुख्याने उपस्थित मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार, कविता रंगारी जिल्हा परिषद सदस्य, ईश्वर कोरे उपाध्यक्ष आदिवासी विविध सेवा सहकारी सोसायटी कनेरी, आशिष येरणे जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार, विशाल वाघाये उपसरपंच, रेखा वैद्य, प्रतिभा बोलके, उमेश वाढई, राहुल भोयर, ताराचंद मेश्राम, प्रेमचंद मेंढे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आनंद चंद्रिकापुरे पुढे म्हणाले महाराष्ट्राच्या भूमीने देशाला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने दोन महान सुपुत्र दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून देशाला वाचविले, तर भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी समतेसाठी आपले जीवन वेचले, अशा भावना आनंद चंद्रिकापुरे यांनी केल्या. धर्म परिवर्तनाचा विचार त्यांच्यापुढे आला, त्यावेळी त्यांनी भारताच्या मातीत निर्माण झालेल्या बौद्ध धर्माचा अंगीकार केला, यावरुन डॉ. आंबेडकर यांचे द्रष्टेपण दिसून येते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिथुन मेश्राम यांनी केले संचालन निकेश उके तर आभाप्रदर्शन सिद्धार्थ बोलके यांनी केले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी युवा भीम मित्र परिवार कणेरी यानी प्रयत्न केले.