तीनचाकी वाहनाचा भीषण अपघात; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Shabd Sandesh
0
शाळकरी मुलांच्या आटोची आपसात जोरदार धडक

शब्द संदेश न्यूज नेटवर्क,
पुसद,दि.११ 

     आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7.30 वाजतच्या सुमारास एक दुःखद घटना घडली. आज सकाळी शाळकरी विद्यार्थी घेऊन जातं असलेल्या दोन ऑटोची आपसात धडक झाल्याने यात एका 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर मुलाचे नाव सौरव भिका राठोड रा. दहिवड बुद्रुक ता पुसद जिल्हा. यवतमाळ असे आहे. सौरव हा पुसद येथील आसेगावकर शाळेत इयत्ता 7 व्या वर्गात शिक्षण घेत होता. आसेगावकर शाळेची स्कूल बस ही दहिवड या गावात जातं नसल्याने तेथील विद्यार्थीना असेच खाजगी ऑटो मध्ये आपला जीव मुठीत ठेवून यावे लागते. आज घडलेल्या घटनेने पालक वर्गात हळहळ व रोष व्यक्त होत आहे. खरं पाहता शहरातील आसेगावकर शाळा व इतरही शाळा या सरकारमान्य असूनही गडगंज डोनेशन घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिल्या जातं नाही. या शाळेची त्यांचे विदयार्थ्यांना ने आन करण्यासाठी स्वतःची स्कुल बस असताना सुद्धा ग्रामीण भागातील विदयार्थ्यांन साठी ही स्कुल बस उपलब्ध का नाही? शाळेच्या विद्यार्थ्यांना ने आन करण्याची जबाबदारी ही शाळेची असताना सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थीना अशा खाजगी ऑटो मध्ये जीवघेणा प्रवास करून शाळेत यावे लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. 
खाजगी ऑटोचालक हे एका ऑटो मध्ये 8 ते 10 विद्यार्थ्यांना कोंबून विना सुरक्षा त्यांना घेऊन अशी वाहतूक करणे हे सर्व विद्यार्थ्यांनच्या जीवित्वशी धोकादायक आहे. असे असताना सुद्धा या ऑटो चालकावर शाळेचे प्रशासन व पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करण्यास तयार नाही. शाळकरी ऑटो च्या व स्कुल बसच्या सर्व वाहन चालकाची संपूर्ण माहिती व परवाना हा शाळेजवळ व पोलिसांजवळ असायला पाहिजे परंतु यावर दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अशा नालायक ड्रॉयव्हर मुलाच्या जीवित्वाची परवा न करता त्यांना घेऊन जीवघेनी वाहतूक करीत आहे यावर अंकुश बसने आवश्यक आहे. यापुढे सर्व शाळांनी आपल्या स्कूल बस सुरु कराव्यात आणि योग्य वाहनचालक त्यावर रुजू करून घ्यावा जेणे करून अशा प्रकारे मुलांचे जीव जाणार नाही. विशेष बाब म्हणजे काही दिवसा अगोदर सुद्धा उमरखेड तालुक्यात एका स्कुल बसचा अपघात झाला व त्या अपघातात सुद्धा एका शाळकरी मुलीचा जीव गेला होता परंतु त्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन जागे झाले नाही. प्रशासनाने अशा वाहन चालकावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)