शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
अर्जुनी मोरगाव, दि.११ फेब्रुवारी २०२५
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील इतियाडोह धरणाच्या कालव्यात आंघोळीसाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाला. हबीबखान जब्बारखा पठाण (६३) रा. ताजबाग नागपूर असे मृताचे नाव आहे. ही घटना 10 फेब्रुवारीची आहे.
सविस्तर असे की, प्रतापगड येथे बाबा उस्मान ख्वाजा याची दर्गा असून मुस्लिम समाज बांधवांचे हे श्रद्धास्थान आहे. मृतक आपल्या मित्रमंडळीसह ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रतापगडला पोहोचले. दरम्यान १० फेब्रुवारीला सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास इटियाडोह धरणाच्या कालव्यात मृतदेह हबीब खान जब्बारखा पठाण, निसार साजिद रशीद खान(४५), अमीर बापू मिया शेख (४३),रेहान मुस्ताक शेख (४१), सर्व राहणार नागपूर.हे आंघोळ झाल्यानंतर बाहेर निघाले. दरम्यान मृतक अंघोळ झाल्यानंतर डब्यात पाणी घेण्यासाठी प्रयत्न करीत असताना, त्याचा तोल गेल्याने धरणात तो वाहून गेला.लगेच याची माहिती केशोरी पोलिसांना देण्यात आली. त्वरित धरणाचे पाणी बंद करण्यात आले व शोध कार्य सुरू करण्यात आला. दरम्यान आंघोळीच्या ठिकाणापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह मिळाला. केशोरी पोलीस ठाण्याचे पो.नी. गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार प्रेमदास होळी, पोसी.मोहन कुहीकर,अजय मौजे तपास करीत आहेत. दरम्यान मृतदेह ताब्यात घेण्यात उत्तरनिय तपासणीसाठी केशोरी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्तकाच्या कुटुंबात चार मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.