पिंपळगाव/सडक शंकर पट शताब्दी महोत्सवात डोंगरीया- शेरा ठरला ट्रॅक्टर विजेता!

Shabd Sandesh
0
पटशौकीन नागरिकांची अलोट गर्दी..
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते बक्षीस वितरण..
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
लाखनी, दि.०७

    लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे वसंत पंचमीच्या पर्वावर दि. ०२ फेब्रुवारी रोजी शंकर पट शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि.०६ फेब्रुवारी रोजी शेवटच्या जोड्यांचा चित्त थरारक शर्यती पाहायला मिळाले होते. यावेळी पटाच्या दोन्ही दाणींना पटशौकीन शेतकऱ्यांची, नागरिकांची अलोट गर्दी होती. पटाच्या मैदानावर लाखो नागरिक उपस्थित होते. सर्वाच्या समोर ट्रॅक्टर विजेती जोडी कोणती? ठरणार. हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर तो क्षण येताच, प्रथम क्रमांकासाठी अजीम पटेल डोंगरीया-शेरा व शोएब पटेल नांदी रणवीर सुलतान यांच्यात झालेल्या चुरशीच्या शर्यतीत अखेर ट्रॅक्टर विजेता डोंगरिया-शेरा ही जोडी विजेती ठरली. पटाच्या दोन्ही बाजूला असलेल्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पटाचे बक्षीस वितरण प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते पार पडले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)