जिल्ह्याच्या सीमा वरती भागात सुरक्षा यंत्रणा तत्पर
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.११ फेब्रुवारी २०२५
छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ११ नक्षलवादी ठार तर २ जवान शहीद झाले आहेत. दोन जवान जखमी असल्याची माहिती आहे. ही चकमक गडचिरोली जिल्ह्याला लागू नसलेल्या छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली. परिसरात शोध मोहीम सुरू असून मृत्तांची संख्या वाढू शकते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सीमा वरती भागात आपली सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली असून नक्षलींच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडगा जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे दोन दलम लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवली होती. दरम्यान लपून असलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनीही प्रत्युत्तर दिले. यात ३१ नक्षलवादी ठार झाले तर २ जवान शहीद व २ जवान गंभीर जखमी झाले आहेत. तीन जिल्ह्यातील सीआरपीएफ, डीआरजी, आणि एसटीएफ च्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी शास्त्री जप्त केली आहेत.
महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर झालेल्या या चकमकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. धानोरा तालुक्याच्या सीमा वरती भागात आपली सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट करण्यात आली आहे. जिल्ह्यात नक्षल यांचा शिरकाव होऊ नये याची दक्षता घेतली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे.