अल्पवयीन मुलाने केला अत्याचार!

Shabd Sandesh
0
शब्द संदेश न्यूज नेटवर्क, 
चंद्रपूर, दि.११ फेब्रुवारी २०२५

    पडोली एमआयडीसी परिसरात अनेक कुटुंब विटा तयार करण्यासाठी मुक्कामी राहतात. त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर त्यांच्या राहण्याची घरे आहेत. शुक्रवारी आई-वडील विटा बनवण्यासाठी गेल्यानंतर एक नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा तिच्या घरी गेला व त्याने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पडोली पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बाल सुधार गृहात रवानगी केली आहे. पीडित मुलीच्या आवाज ऐकून तिचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले. पीडित मुलीने झालेला प्रसंग सांगितला. त्यावेळी त्यांनी पडोली पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी अट्रासिटी, पोक्स अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पडोली पोलीस निरीक्षक योगेश हिवसे  यांनी दिली.
     वारंवार या घटनेला मोबाईल कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे त्यामुळे आपल्या पाल्ल्य मोबाईलचा किती उपयोग करतो. तो त्यावर काय सर्च करतो.याबाबत पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे. अशा घटनावर आळा घालण्यासाठी जनजागृतीसह पालकांनीही लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या घटनेतून अल्पवयीन मुलगा मोबाईलच्या अतिवापर करत असल्याची माहिती आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)