शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
दि.२८
ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने मृत्यू
शासकीय नोकरीवर असलेल्या मुलीला सुट्टी असल्यामुळे ती मित्राच्या दुचाकीवरून घराकडे निघाली.निघताना तिने आई-वडिलांना फोन करून माहिती दिली. मात्र काळाने तिचा घात केला. घरी पोहोचण्यापूर्वीच ट्रकने दुचाकीला धडक दिली.या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. तर, तिचा मित्र गंभीर जखमी झाला. दुसरीकडे मुलगी घरी पोहोचत असल्यामुळे रस्त्याकडे डोळे लावून बसलेले आई-वडीलासमोरच रुग्णवाहिकेतून थेट मुलीचा मृतदेह दारात आला.
ही घटना बुधवारी दुपारी घडली. काजल देशराम भंडारकर (२५) रा. चिखली ता.सडक अर्जुनी जि. गोंदिया असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे तर, कोमेश चेतराम झोडे (२६) रा.सुंदरी/परसोडी तालुका साकोली जि. भंडारा असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.
काजल भंडारकर ही प्रादेशिक म्हणून रुग्णालयात नोकरीला होती. बुधवार सुट्टीचा दिवस असल्याने तिला घरी जायचे होते. सायंकाळपर्यंत घरी येते असा निरोपही तिने आई-वडिलांना दिला. दरम्यान तिचा मित्र कोमेस झोडे हा कामानिमित्त नागपुरात आला होता. काम आटोपल्यानंतर तो गावी जाणार होता. त्याच्यासोबत काजलही घरी जाण्यास निघाली. भंडारा रोड कडे जाणाऱ्या उडान पुलावर ट्रकचालकाने दूचाकीला मागून धडक दिली. या अपघातात काजलचे डोके दुभाजकावर धडकले. पोलिसांनी त्या दोघांनाही मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केले. कोमेस वर उपचार सुरू आहे. कोमेसच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलीस उपायुक्त आणि रुग्णालयात पोहोचवले
पोलीस उपयुक्त निकेतन कदम त्याच मार्गाने जात होते.रस्त्यावर लोकांची गर्दी पाहून ते थांबले. काजल गंभीर जखमी अवस्थेत होती. योगायोग असा की, त्याच वेळी रुग्णवाहिका जात होती. त्यात टाकून जखमींना मेयो रुग्णालयात पोहोचवले. मात्र उपचारादरम्यान काजलचा मृत्यू झाला