देवरी येथील शिक्षकाचा प्रताप; विद्यालयात खळबळ
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.१८ फेब्रुवारी २०२५
देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच एका शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना शनिवार (दि.१५) ला घडली शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्यावर विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टच चे धडे दिले जात आहेत. तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकांच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना देवळी येथे घडली या संताप जनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये एकच खडबड उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर हा मागील काही दिवसापासून देवरी येथील एका विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शिक्षकाने शाळेतीलच एका शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला "दोन हजार रुपये देतो, मला एक चुंबन दे!" अशा प्रकारचे लज्जास्पद कृत्य करून तिचा विनयभंग केला. याविषयीची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध देवरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. देवरी पोलिसांनी अपराध क्रमांक ५३/२५ भारतीय न्याय संहिता ७५(२) ७९ या कलमाअंतर्गत आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गीता मुळे या करीत आहेत. या संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.