टिल्लू पंप धारकांवर कारवाई; कवठा ग्रामस्थांना दिलासा

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
अर्जुनी मोरगाव, दि.१४
 अर्जुनी मोरगांव तालुक्यातील कवठा गावात टिल्लू पंप धारकांवर कारवाई खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मागील बारा वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही दिवसांपासून गावकऱ्यांकडून पाणी अपुरे मिळत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर संस्थेचे कर्मचारी तुषार मेश्राम, सचिव कालिदास पुस्तोडे आणि सुजल सामाजिक सेवा समितीच्या सदस्य सरिता लंजे यांच्या माध्यमातून गावात तपासणी करण्यात आली.

या तपासणीत कार्तिक परसुरामकर, विलास मेंढे आणि ऋषी बहेकार या तीन कुटुंबांनी टिल्लू पंपद्वारे अनधिकृतपणे पाणी उपसा केल्याचे आढळून आले. त्यामुळे इतर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती. यावर त्वरित कारवाई करत संबंधित टिल्लू पंप धारकांचे नळ कनेक्शन तात्पुरते बंद करण्यात आले तसेच प्रत्येकी ५,००० रुपये दंड ठोठावण्यात आला.

या कारवाईमुळे भविष्यात गावाला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे मत संस्थेचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी व्यक्त केले. ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत करत संस्थेचे आभार मानले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)