शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
सडक अर्जुनी, दि.१३
नागपूरकडून डोंगरगडकडे जाणाऱ्या विर सागर महाराजांच्या संघातील सेवक शितल जैन(६१) यांच्या राष्ट्रीय महामार्गावर डूग्गीपार या गावाजवळ ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना बुधवारी (दि.१२) घडली.
प्राप्त माहितीनुसार,मृतक शितल पुरनचंद जैन हे जैन ट्रस्ट मंडळ रामटेकचे पदाधिकारी होते. तसेच आचार्य गुरुवर विद्यासागर महाराजांचे अनन्य भक्त म्हणून त्यांची ओळख होती. नागपूरवरून डोंगरगडकडे निघालेल्या विर सागर महाराजांच्या संघासोबत सेवा देण्याकरिता ते निघाले होते. बुधवारी (दि.१२) दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील डुग्गीपार नैनपुर या ठिकाणी विर सागर महाराजांना पाणी देण्याकरता आपली कार थांबून ते उतरत असताना, मागून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. व ते गंभीर जखमी झाले.त्यांना उपचाराकरता येथील ग्रामीण रुग्णालय या दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला.