शेतकऱ्याची आत्महत्या; ग्राम मोहगाव बुद्रुक येथील घटना

Shabd Sandesh
0
गोंदिया दि.११ फेब्रुवारी २०२५
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,

       ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत तालुक्यातील ग्राम मोहगाव बुद्रुक येथील देवेंद्र भजनलाल पटले (४५) या शेतकऱ्याने कर्जापायी घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दि.१० फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ८:३० दरम्यान उघडकीस आली.
   प्राप्त माहितीनुसार,मोहगाव बुद्रुक येथील रहिवासी शेतकरी देवेंद्र पटले हे रविवारी दि.९ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी १२:०० वाजता पासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते.अशातच सोमवारी दि. १० फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ८:३० वाजता त्या सुमारास देवेंद्रचा मृतदेह शेजारी असलेल्या रिकाम्या घरातील आळ्याला आढळला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. देवेंद्रवर बँकेचे कर्ज होते असे सांगितले जात आहे. त्या कर्जाला कंटाळूनच देवेंद्रने आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे. देवेंद्र च्या मागे पत्नी, आई,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)