"बाजारी विकलेली नार"अर्थात "भाड्याची बायको"नाट्यप्रयोगाचे देवरीत आयोजन

Shabd Sandesh
0
तरुण पंचशील नाट्यमंडळाच्या वतीने
शनिवारला प्रयोग..
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.२९ जानेवारी २०२५

        धडीच्या नावाच्या कुप्रथेखाली मध्यप्रदेशातील शिवपुरी भागात बायकांचा बाजार भरवून भाड्याने बायको विकत घेणाऱ्या सत्य घटनेवर आधारित नाटक प्रत्यक्ष आपल्या शहरात पाहण्याची संधी आता देवरीवाशीयांना उपलब्ध झाली आहे.'चंद्रभागा प्रस्तुत शिवम थिएटर नागभीड-वडसा ग्रुपतर्फे देवरीतील तरुण पंचशील नाट्यमंडळाचा "बाजारी विकलेली नार" अर्थात "भाड्याची बायको" नाटकाचा प्रयोग शुक्रवारी ०१ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ८:०० वाजता पंचशील चौक देवरी समाज मंदिर येथील भव्य आवारात (बंद शामियानात) आयोजित करण्यात आली आहे. 
    सदर नाटकाचे उद्घाटक नामदेवराव किरसान खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र, सह उद्घाटक उषाताई शहरे जि.प. सदस्य गोंदिया, अध्यक्ष संजय पुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र,उपाध्यक्ष संजूभाऊ उईके नगराध्यक्ष नगरपंचायत देवरी, दीप प्रज्वलन के.सी.शहारे सर सेवानिवृत्ती प्राचार्य, जी.एम. मेश्राम म.भा.प.विद्यालय देवरी,रंगपूजन देवराम गुन्नेवार उद्योगपती देवरी, विजय गहाणे उद्योगपती देवरी,रमेश ताराम माजी जी.प.सदस्य गोंदिया,यांच्या हस्ते होणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)