अवैध रेती चोरट्यांविरुद्ध रावनवाडी पोलिसांची धडक कारवाई

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,                                  गोंदिया,दि. ३० जानेवारी २०२५

कारवाईत 03 ट्रैक्टर चालक व मालकांवर अवैध रेती उत्खनन चोरी प्रकरणात गुन्हा नोंद- 

तीन ट्रॅक्टर तीन ब्रास रेती असा एकुण किमती 15 लक्ष 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त-

      गोंदिया जिल्हयातील नदी, नाला पात्रातून अवैधरित्या रेती/वाळुचे उत्खनन करून रेती चोरी करणाऱ्या रेती तस्करांवर आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी गोंदिया जिल्हा यांना निर्देशित केले होते.

     त्या अनुषंगाने पोलीस ठाणे रावणवाडी व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक - 30/01/2025 रोजी चे पहाटे 04/00 वा. सुमारास पो. ठाणे रावणवाडी हद्दीत कारवाई करत पोलीस पथकाने ग्राम तेढवा गावा जवळील वैनगंगा नदीच्या पात्रामधुन अवैध रेती (वाळु) उत्खनन करणा-या तस्करांवर छापा घालून व 03 ट्रैक्टर ताब्यात घेण्यात आले....चालक व ट्रॅक्टर मालंकावर कारवाई करण्यात आली आहे... एकुण तीन ट्रॅक्टर किंमती 15 लक्ष 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे..

            सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडीचे पो.नि. वैभव श्री.पवार, स.पो.नि.सुनिल अंबुरे, अंमलदार संजय चौव्हाण, सुशिल मलेवार, छगन विठठले, मनोज राऊत, कृष्णा कटरे यांनी  कामगीरी बजावली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)