जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा वडेगाव येथील विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप

Shabd Sandesh
0
शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली आहे:-सरपंच अंजूताई बिसेन
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.२९ जानेवारी २०२५

        समाजाचे आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेने नेहमी समाज हितासाठी कार्य करणारे देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत वडेगावच्या सरपंचा सौ.अंजूताई अनिल बिसेन यांच्या सामाजिक कार्यातून ग्राम वडेगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दि.२७ जानेवारी २०२५ रोज सोमवारला दप्तराचे वाटप करण्यात आले. 
      सविस्तर असे की, शिक्षित असणे ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट शिक्षण म्हणजे केवळ माहिती जमा करणे नव्हे तर,ज्ञान मिळवणे हे तुम्हाला तार्किकदृष्ट्या विचार करण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा वापर आपण जग बदलण्यासाठी करू शकतो. जीवनात यश मिळवण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन आहे. हे अशा संधीचे दरवाजे उघडते जे अनुउपलब्ध असतील. कोणत्याही क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली आहे. मग ते शैक्षणिक असो, व्यवसायिक असो किंवा क्रीडा असो.असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सरपंच अंजूताई बिसेन यांनी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगाव येथील ८७ विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप केले.त्याप्रसंगी मुख्या. पवनकर मॅडम, कुरसुंगे सर,आव्हाड सर,मांडवकर सर, राऊत सर,रिना टेंभंरे मॅडम, रहागंडाले मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करचाल, माता पालक समितीचे अध्यक्षा सौ.अरुणा बिसेन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)