शासनाने कशासाठी दवंडी दिली याची चर्चा..
डफली वाजवून दवंडी देण्याची एक प्रथा होती..
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.१४ डिसेंबर २०२४
ग्रामीण भागात ग्राम स्तरावर ग्रामपंचायत व गावाला शासनाकडून कळविण्यात येणाऱ्या माहितीसाठी उपाय योजना बाबत दवंडी देऊन माहिती कळविण्यात येत होती ही माहिती संध्याकाळी किंवा सकाळी डफली वाजवून गावात चौकात चौकात व गल्ली गल्लीत सांगत होते. त्यामुळे नागरिकांना चौकात थांबणाऱ्या या गल्लीत उद्भवणाऱ्या डफलीमुळे नागरिक घराच्या बाहेर येऊन काय आहे, काय नाही, कशाची माहिती आहे अशी विचारपूस करीत होते. शासनाने कशासाठी दवंडी दिली याची चर्चा पारावर व गल्लीत मंदिरावर होत होती.
परंतु, डफली गेली मोबाईल आला शासनाची योजनाही व्हाट्सअप, सोशल मीडिया यावर येऊ लागली. आज रोजी दवंडी ही जुन्याकाळी जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचे साधन आज बंद ग्रामीण भागात शासकीय, निमशासकीय व इतर कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी "ऐका हो ऐका" असा डफली वाजून दवंडी देण्याची एक परंपरा होती. ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आली होती. गावातील कार्यक्रमाची माहिती ग्रामपंचायतमार्फत डफलीवरून लोकांना दिली जात होती. ज्यामुळे गावकऱ्यांना घराघरात आणि शाळा, घरे,दुकाने अशा ठिकाणी एकच सूचना ऐकायला येत होती. "ऐका हो ऐका" या शब्दाच्या घोषणेनंतर त्या कार्यक्रमाची माहिती समजून उमजून त्यानुसार लोकांची उपस्थिती निश्चित होईल. परंतु काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरात झालेल्या बदलामुळे दवंडी देण्याची पद्धत हद्दपार झाली आहे. ज्यामुळे गावकऱ्यांना घराघरात आणि शाळा, घरे, दुकाने अशा ठिकाणी एकच सूचना ऐकता येत होती. "ऐका हो ऐका"या शब्दाच्या घोषणेनंतर त्या कार्यक्रमाची माहिती समजून उमजून त्यानुसार लोकांची उपस्थिती निश्चित होई. परंतु, काळा नुसार तंत्रज्ञानाच्या वापरात झालेल्या बदलामुळे दवंडी देण्याची पद्धत हद्दपार झाली आहे.