प्रशासन तसेच जनप्रतिनिधीचे दुर्लक्ष..
गोरेगाव, दि.०२ डिसेंबर २०२४
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
तालुक्यातील मोहाडी ते कवडीटोला असलेल्या २.०० कि.मी.रस्त्यावरील संपूर्ण डांबरीकरण निघाले असुन, मागील दहा वर्षांपासून या रस्त्याच्या कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही आहे.त्यात रस्त्याच्या मधोमध एक मोठा गढ्ढा पडल्यामुळे, अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास याची जबाबदारी क्षेत्रीय जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभाग घेईल का? असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.
सविस्तर असे की,या रस्त्यानी दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी,प्रवासी नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करीत असतात. या रस्त्याकडे कोणत्याही जनप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने प्रवासी नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागील दहा वर्षापासून रस्त्याची स्थिती जैसे थे असल्यामुळे, अद्यापही रस्त्याची डागडूजी करण्यात आलेली नाही. सदर रस्त्यावरील प्रवास रात्रंदिवस होत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याची संपूर्णतः चाळण झालेली आहे. याकडे क्षेत्रातील जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने त्वरीत पडलेला गढ्ढा बुजविण्याची व नवीन रस्ता बांधकाम करण्याची मागणी केली आहे.