पथदिवे त्वरित सुरू करावेत, बोरगाववाशीयांची मागणी...
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी,दि.२०
देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत ग्राम बोरगाव वार्ड क्र.१ येथील गावातील मागील पाच दिवसापासून पथदिवे बंद असल्याने, रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे पथदिवे त्वरित सुरू करावेत अशी मागणी बोरगाववाशीयांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केली आहे.
देवरी आमगाव या राज्यमार्गावरील वसलेला छोटासा गाव बोरगाव. सदर मार्गावरून रात्रंदिवस अनेक वाहने धावत असतात. पथदिवे बंद असल्यामुळे राज्य मार्गावरून ये जा करताना वाहनाची गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावाची स्थिती लक्षात घेता गावातील विजेच्या खांबांना पथदिवे लावले आहे. रात्रीच्या वेळेस पथदिवे सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांना सोयीस्कर होत होते. परंतु,मागील पाच दिवसापासून गावातील पथदिवे पूर्णतः बंद असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळेस काही वेळ फेरफटका मारताना अंधारात साप,विंचू अशा विषारी कीटकांची भीती निर्माण झाली आहे.
शिलापूर ग्रामपंचायत प्रशासनाने बोरगाव या गावातील पथदिवे त्वरित सुरू करावे. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.