वय होऊनहीं मुले अविवाहित; आई-वडिलांची वाढली चिंता
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
गोंदिया, दि.१९ डिसेंबर २०२४
यंदा दिवाळी झाल्याबरोबरच तुळशीचे लग्न आटोपून ग्रामीण भागात उपवर-वधूचे पालक आपल्या मुला मुलीचे लग्न व्हावे या अपेक्षाने प्रयत्न करीत आहेत. मात्र मुला मुलीच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याने, यंदाही लग्नगाठ जोडून येईल की नाही. अशी चिंता आई-वडिलांना पडली आहे.
सध्या सर्वच समाजामध्ये मुलांच्या लग्नाचे वय होऊन सुद्धा मुलीसह त्याचे आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्यामुळे मुलांना अविवाहित राहण्याची वेळ आली आहे. मुलाच्या तुलनेत, गत दहा वर्षात मुलींनी शिक्षणाच्या बाबतीत बाजी मारीत चांगल्या ठिकाणी नोकरी करीत आहेत. तसेच मुली वैद्यकीय, अभियांत्रिकी विभागामध्ये नोकरी करीत आहेत. स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. त्यामुळे, मुलीची त्याच्या बरोबरीचा नवरदेव मिळावा किंवा त्यांच्या पेक्षा जास्त पैसा कमाविणारा नवरदेव मिळावा. या अपेक्षेमध्ये वावरत आहेत. तसेच मुलांकडे गाडी, शेती, नोकरी असावी असा अट्टहास वाढला आहे. त्यामुळे मुलीचे व मुलांचे लग्न जमणे अवघड झाले आहे. समाजामध्ये प्रत्येक घरी स्वतःची प्रत्येकापासी शेती,गाडी, पैसा असेलच असे नाही. परंतु आपल्या समाजातील शून्यातून विश्व निर्माण करणारे असे कित्येक तरी आहेतच.
मुलींच्या अपेक्षांचे ओझे वाढले
मुलीचे शिक्षण जास्त प्रमाणामध्ये वाढने. एकाप्रकाराने चांगलेच आहे. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या पालकांचे नवरदेवाबाबतीत अपेक्षा जास्त प्रमाणात वाढले आहेत. मुली अभियांत्रिकी,वैद्यकीय, शासकीय सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवत असून त्यांना त्यांच्या बरोबरीचा अथवा त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला अथवा कमावणारा नवरदेव मिळावा. अशी अपेक्षा वाढलेली समाजात दिसून येत आहे. काहीजण कबाड कष्ट करून स्वतःच्या मुलांना शिकवीत असतात.या परिस्थितीची जाणीव आजच्या मुलांनी व मुलींनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत याउलट आई-वडिलांच्या परिस्थितीचे मुलांना भान नसून, मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत.