नरभक्षी वाघाने आधी मानव नंतर, गाय आणि म्हशीला केले ठार

Shabd Sandesh
0
कांद्री वनपरीक्षेत्र अंतर्गत पिटेसूर/ सोरणा जंगलातील घटना
  
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
  तुमसर, दि.१३ 

     जांब कांद्री वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पिटेसूर गाव परिसरातील सोरणा जंगलात एका पट्टेदार वाघाने पिटेसूर येथील मासेमारी व्यवसाय करणारा लक्ष्मण मोहनकर याचा ०४ डिसेंबर रोजी वाघाने बळी घेतला होता. सदर घटना ताजी असताना, परत आठवड्याभरात  सदर घटनेची शाही वाळते न वाळते ११ डिसेंबर रोजी भर दुपारी त्याच पट्टेदार वाघाने सोरना येथील पशुपालक शिवशंकर शिवरकर यांची एक गाय ठार केली. तर त्याच दिवशी  कन्हैया राठोड यांची एक म्हैस ठार केल्याची घटना घडली. परिणामी पुन्हा पिटेसुर/सोरणा येथे नागरिकात वाघाची दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर जंगल परिसरात परत मानव वन्यप्राणी संघर्ष वाढला असल्याने येथे वन विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.अन्यथा नागरिकांचा वन विभाग विरोधात आगामी काळात उद्रेक पाहायला मिळणार आहे. 
 घटनेच्या दिवशी सोरना येथील पशुपालक शेतकरी कन्हैया राठोड व शिवशंकर शिवरकर यांनी सोरणा पिटेसूर जंगल परिसरात सोरना तलावाजवळ गायी,म्हशी चारण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान, झुडपात दबा धरून बसलेला पट्टेदार वाघाने एकाच वेळी गाय व म्हशीवर जोरदार हल्ला चढवीत गाय व म्हशीला जागीच ठार केले. दरम्यान दोन्ही पशुपालक गाईजवळ गेले असता, गाय व म्हैश वाघाच्या हल्ल्यात ठार झाले होते. सदर घटनेची माहिती जांब कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे यांना देण्यात आली. घटनेची माहिती होताच घटनास्थळी कांद्री वनपरिक्षेत्रातील वनरक्षक,वन अधिकारी व चमू दाखल होत घटनेच्या पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गाय व म्हैस मालकाला वन विभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व त्या नरबक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील येथील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)