अपघातग्रस्तांसाठी ठरतोय,"तो" देवदूत!

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.२०

     एखाद्या ठिकाणी अपघात झाला की अपघातग्रस्तांची मदत न करता, त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपल्या जीव गमावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आले आहेत. परंतु अपघात झाल्याचे करतात हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून,आशिष मेश्राम यांची अशी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत त्यांनी हजारापेक्षा अधिक अपघातग्रस्तांना आपल्या चार चाकीवाहनाने रुग्णालयात नेत जीवदान दिल्याने मदतीसाठी धावून येणारा,"देवदूत" अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे.
   बोरगाव (ता.देवरी) या छोट्याशा गावातील आशिष मेश्राम हे आपले चारचाकी मालवाहक चालवीत उदरनिर्वाह करतात. पण आपण समाजाचे काही देणे लागतो, "सेवाभाव परमो धर्म" उक्तीनुसार अडीअडचणीत किंवा अपघातग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, या आई-वडिलांच्या शिकविनेतून आशिष मेश्राम  कित्येक वर्षापासून अपघात ग्रस्तांची मदत करीत आहे. रुग्णवाहिकेची वाट न बघता रुग्णाचा जीव वाचविण्याकरिता स्वतःची चारचाकी मालवाहक आणून, सर्वप्रथम प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गाठत असतो. अशा प्रकारे त्यांनी कित्येक अपघातग्रस्तांना जीवनदान दिले आहे. 

पूर्वी अपघातग्रस्ताची मदत करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जायची. परंतु नागरिकांनी आपल्या मनातील ही भीती दूर करून, अपघात ग्रस्ताचे फोटो काढत बसण्यापेक्षा त्याला तत्काळ रुग्णालयात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे. त्यावेळी जाती धर्माचा विचार न करता माणुसकीचा धर्म पाडावा.:- आशिष मेश्राम

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)