वातावरण बदलाचा परिणाम; व्हायरल इन्फेक्शनमुळे नागरिक त्रस्त
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.०८ डिसेंबर २०२४
गत काही दिवसापासून वातावरणात बदल झाल्याचे याचा परिणाम थेट नागरिकांच्या प्रकृतीवर होताना दिसत आहे. तापमानाचा पारा झपाट्याने खाली गेल्यामुळे सर्दी,खोकला, ताप,घशाचे त्रास आणि दम्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे निदर्शनात येत आहे.
थंड हवामानामुळे शरीराची उष्णता टिकविणे कठीण जाते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांसाठी थंडी विशेष संवेदनशील असल्यामुळे त्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. थंड हवेमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. शिवाय कोरड्या हवेमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी संसर्गाचा धोका अधिकच वाढतो.
थंडीत गरम कपड्याच्या योग्य वापर करणे गरजेचे आहे.डोके कान आणि पाय गरम ठेवणे, महत्त्वाचे आहे कोमट पाणी पिणे, हलका पण पौष्टिक आहार घेणे. घरगुती उपायांचा अवलंब केल्यास सर्दी खोकल्यासारखे आजारापासून बचाव होतो. अशी घ्यावी काळजी?. हिवाळ्यात संतुलित आहार घ्यावा. आहारात विटामिन सी युक्त पदार्थ आवळा, संत्री, पालेभाज्या, गुळ, सुकामेवा आणि लसूण यांचा समावेश करावा. सर्दी साठी वाफ घ्यावी. आले-तुळशीचा काढा प्यावे. थंड पदार्थ टाळावे.
नियमित करा व्यायाम
पुरेशा झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमित व्यायाम, संतुलित आहार, गरम पाणी, स्वच्छतेच्या सवयीचा अवलंब करणे महत्त्वाची आहे. लहान मुलांची विशेष काळजी घेऊन त्यांना थंडीत सुरक्षित ठेवण्यात ठेवणे आवश्यक आहे. थंडीचा प्रभाव कमी होईपर्यंत, व उपाययोजना केल्यास प्रकृतीचा त्रास कमी होईल.