शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.१४ डिसेंबर २०२४
तबल्यातून ताल सारेच काढतात.याच तबल्यातून सुरेख सूरही काढणारे जादूगर उस्ताद झाकीर हुसैन (वय ७३) यांचे रविवारी निधन झाले. अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५२ रोजी मुंबईत झाला होता. त्यांना १९८८ मध्ये "पद्यश्री",२००० मध्ये "पद्यभूषण" आणि २०२३ मध्ये 'पद्यविभूषण" या ख्यातीचे तीन ग्रॅमि अवार्डही त्यांना प्राप्त झाले होते. वडील उस्ताद अल्ला रक्खा कुरैशी त्यांचे पहिले गुरु होते. झाकीर हुसेन यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील माहीमच्या सेंट मायकल स्कूल मध्ये झाले होते. सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतले.
बाराव्या वर्षी पहिला शो
अवघे बारा वर्षाचे असताना, त्यांनी अमेरिकेत पहिली कॉन्सर्ट केली होती. १९७३ मध्ये त्यांनी आपला पहिला अल्बम "लिविंग इन द मटेरियल वर्ल्ड"लाँच केला होता.
*बालपणीच दिग्गजांना केले होते थक्क*
बारा वर्षाच्या असताना त्यांनी पंडित रविशंकर,उस्ताद अली अकबर खा, बिस्मिल्ला खान, पंडित शांताप्रसाद आणि पंडित किसन महाराज सारख्या दिग्गजासमोर तबल्यावर आपली जादू ही बोटी फिरविली. आणि संगीतातील हे सारे दिग्गज थक्क झाले होते.
२०१६ मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये सहभागी साठी व्हाईट हाऊस मध्ये बोलवून घेतले होते. असा सन्मान प्राप्त झालेले झाकीर हुसेन पहिले भारतीय संगीतकार ठरले.
चित्रपटातून अभिनयही
झाकीर हुसेन यांनी १९८३ मध्ये "हिट अँड डस्ट" या ब्रिटिश चित्रपटातून शशी कपूर यांच्यासह भूमिका केली होती.
१९९८ मधील "साज" यात हिंदी चित्रपटातून शबाना आजमी सह त्यांनी भूमिका साकारली होती.