मालवाहू ट्रकच्या धडकेत;सायकलस्वार गंभीर जखमी

Shabd Sandesh
0
देवरी-आमगाव मुख्य रस्त्यावरील बोरगावनजिक पिंडकेपार फाट्यावरील घटना..
      शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी,१८ डिसेंबर २०२४

दि.१८ डिसेंबर २०२४ रोज बुधवार ला देवरी आमगाव मुख्य रस्त्यावरील ग्राम बोरगाव नजीक पिंडकेपार फाट्यावरील झालेल्या मालवाहू ट्रकच्या अपघातात, सायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे. योगराज बिसन राऊत (४२) अपघातात जखमी झालेल्या, सायकलस्वाराचे नाव आहे. त्याला प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आले आहे. 
   सविस्तर असे की, योगराज राऊत हा इसम गावावरून देवरीच्या दिशेने सायकलने जात होता. तर मालवाहू ट्रक क्र.एम. एच.१० ए.क्यू.६००६ देवरी कडून आमगावच्या दिशेने येत होता. सायकल आणि ट्रक यांच्या अमोरासमोरील झालेल्या अपघातात,सायकलस्वार गंभीर जखमी झाला.गावकऱ्यांच्या मदतीने जखमी इसमाला ग्रामीण रुग्णालय देवरी येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आहे. सदर घटना देवरी पोलीस ठाणे अंतर्गत घडली असून पुढील तपास सुरू आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)