आष्टी येथील खून प्रकरणाचा पोलिसांनी केला पर्दाफाश..
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
आष्टी, दि.२० डिसेंबर २०२४
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे किरायाने राहणाऱ्या इसमाचा त्याच्या घरमालकानेच गळा चिरून हत्या केल्याचा पर्दाफाश आष्टी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी आरोपी घरमालक खुशाल कुकडकर राह. आष्टी याला अटक केली आहे.
आष्टी येथील खुशाल कुकुडकर यांच्या घरी दोन ते तीन महिन्यापासून किरायाने राहण्यास आलेल्या रशीद अहमद शेख(५३) त्याच्या खून झाल्याची घटना १५ डिसेंबर २०२४ रोजी उघडकीस आली होती. या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २११/२०२४ कलम १७३(१) भारतीय न्यायसंहिता २.२३ अनन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.पो.नी. काळे यांच्यासह त्याच्या पथकाने या प्रकरणी संशयित घर मालक खुशाल वणु कुकडकर याला त्याबाबत घेऊन त्याच्याकडे चौकशी केली सातत्याने सांगितले की, मृत्यू आरोपीकडे राहत असलेल्या रूमच्या किरायाचे पूर्ण पैसे न देता रूम सोडून जात असल्याने आरोपीने मृतकास किरायाचे पैसे मागितले असता, मृतकाने किरायाचे पैसे न देता आरोपीच्या परिवाराला उद्देशून अश्सिल शिवीगाळ केल्याने त्याच्या मनात राग धरून राड ने मारल्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून खून केल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
सदरच्या गुन्हा उघडकीस आणण्यास पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पो.नी. विशाल काळे व पथकाने केली.