जीर्ण पुल देतोय, अपघाताला आमंत्रण

Shabd Sandesh
0
चिचेवाडा-मरामजोब रस्त्यावरील पुलाची दुरावस्था 
      जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे दुर्लक्ष...
    शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.04
गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे आणि मोठी वाहतूक असलेले पूल नादुरुस्त आहेत. यामध्ये, देवरी तालुक्यातील गोटाबोडी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत चिचेवाडा ते मरामजोब रस्त्यावरील पुलाचा समावेश आहे. जीर्ण झालेल्या या पुलावरून दिवसाला शेकडो नागरिक ये जा करीत असतात. अशातच, एखादवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील गोटाबोडी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत चिंचेवाडा ते मरामजोब या रस्त्यावरील छोट्या नदीवर असलेल्या पुलाचे उन्हाळ्यातच लोकसहभागातून खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. याचा चांगला परिणाम पाहायला मिळाला आहे.परंतु, पुलाची उंची कमी असल्यामुळे, दरवर्षी पडणाऱ्या पावसाने पुलावरून पूर जात असते. यंदा पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण असल्यामुळे, कित्येक वेळा पुराचे पाणी पुलावरून वाहून गेले. त्यामुळे पुलाला खिंडार पडून, तुला जवळील किनाऱ्याची पूर्णतः माती खचल्याने,पुलावर जागोजागी खड्डे निर्माण झाले. 
     या पुलावरून सर्वात जास्त शेतकऱ्यांचे जाणे येणे असल्यामुळे, शेतातील पिकांची वाहतूक याच रस्त्यावरून शेतकरी करीत असतात.
तसेच इतर वाहनांची वाहतूक सुरू असते. हा पूल जीर्ण झाला आहे. या पुलाला कठडे नसल्याने हा पुल अगदी मोकळा झाला आहे.त्यामुळे एखादवेळी पाण्याचा प्रवाह वाढून हा पुल तुटण्याची शक्यता आहे. अशावेळी पुलावरून एखादे  वाहन धावत असल्यास मोठा अपघात घडून जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाला केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)