अर्जुनी/मोर. ते वडसा मुख्य रस्त्यावरील ईसापुर जवळील घटना..
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
अर्जुनी/मोर,दि. 9 डिसेंबर 2024
आपल्या घरून शेताकडे जात असताना इसापूर येथील शेतकरी वासुदेव विठोबा लांजेवार वय वर्ष ६५ यांचा दि. ०९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास इसापूर माहूरकुडा जोड रस्त्यावर धानाचा कोंडा भरलेल्या ट्रक खाली दबून मृत्यू झाला.
सविस्तर असे की,शेतकरी असलेला वासुदेव हा आपल्या शेताकडे जात असताना अर्जुनी मोर वडसा रस्ता ओलांडत असताना, त्याच वेळी अर्जुनी मोर कडून वडसा कडे जाणाऱ्या धानाचा कोंडा भरलेला ट्रक क्रमांक एम.एच. ४९ ए.टी.३२५९ हा ट्रक पलटला. या ट्रक खाली शेतकरी वासुदेव लांजेवार दबून जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळतात अर्जुनी मोर चे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी आपल्या पोलिसांसह घटनास्थळ गाठून दोन जेसीबींच्या साहाय्याने मृतक वासुदेव यांचा मृत्यदेह बाहेर काढण्यात आला.उत्तरीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे रवाना केले.