तलावात बुडून ट्रक चालकाचा मृत्यू

Shabd Sandesh
0
सेंदुरवाफा परिसरातील प्रगती कॉलनी जवळील तलावातील घटना 
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
साकोली, दि.२३ डिसेंबर २०२४

    साकोली शहरालगतच्या शेंदूरवाफा येथील तलावात आंघोळी करिता केलेल्या ट्रक चालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी घडली. दिलीप शिवराम मौजे (४०) राह. खुर्शीपार ता. गोरेगाव ह.मु.सेंदुरवाफा असे मृतकाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.
    दिलीप मौजे हा ट्रक चालक असून काही वर्षापासून तो सेंदुरवाफा  येथे राहत आहे. दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी तो आपल्या साळ्यासोबत प्रगती कॉलनी जवळील बोडीवर प्रांतविधी करिता गेला होता. तेव्हा त्याला आंघोळीचा मोह आवरता आला नाही. आंघोळीसाठी पाण्यात उतरला त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतकाला पोहता येत नसल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती साकोली पोलिसांना मिळताच, पोहवा. गुलाब घासले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. होमगार्डचे जवान, मासेमार समाज बांधव इतर गोताखोरांच्या मदतीने मृतदेहाच्या शोध घेतला मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते.मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा बराच परिवार असून त्याच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)