साहेब.! शेती व्यवसायाला "अच्छे दिन" कधी?

Shabd Sandesh
0

जगाचा पोशिंदा शेतकरी आजही खितपत
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.१४ डिसेंबर २०२४

    वर्षभर शेतात राब-राब राबायचे, थंडी,ऊन,वारा,पाऊस यांच्यासह साप,विंचू,हिस्स्र प्राणी काट्याकुट्याची तमा न बाळगणारा,रात्रीचा दिवस करून कष्ट करायचे. निसर्गाने साथ दिली तर चांगले उत्पन्न घ्यायचे. निसर्गाने अवकृपा केली तर आर्थिक भुर्दंड सोसायचा. निसर्ग साथ देत नाही व शासनही जवळ करीत नसल्याचे बोलल्या जात आहे.
आसमानी व सुलतानी संकटांना झुंजत राहायचं. मग शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे? मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना "अच्छे दिन" चे स्वप्न दाखविले खरे.. पण शेतकरी व शेती व्यवसायाला अच्छे दिन कधी येणार? असा प्रश्न उपस्थित होत असून, सततच्या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
   यावर्षी "अच्छे दिन" येईल असे वाटले परंतु, बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. सातबारावर कर्जाचा बोजा कायम असल्याने, पुढील वर्षाकरिता कर्ज मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांकडून बँकेचे उंबरठे झिजवणे सुरू आहेत. तर सततच्या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणजे धान.धानाला मिळणाऱ्या भावामुळे लागवटीचा खर्चही निघत नाही. खरीप हंगामातील सुरुवातीची पिके परिस्थिती पाहत यावर्षी चांगले उत्पन्न होईल असे वाटले.परंतु,रोगाच्या प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे त्यात उत्पन्नात झालेल्या घटीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याकरिता विजेची सोय नसल्यामुळे, शेतकरी खरोखर अडचणीत सापडलेला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)