मोबाईलचा स्फोट;एकाचा जागीच मृत्यू तर,सोबती जखमी

Shabd Sandesh
0
सिरेगाव-सानगडी मार्गावरील केसलवाडा फाट्यावर ची घटना..
      शब्द संदेश न्यूज नेटवर्क, 
          मोर./अर्जुनी, दि.०७
        मोटर सायकलने जात असताना, शर्टच्या पाकीट मधील मोबाईलचा स्फोट झाला. त्यात एकाचा जागीच मृत्यू तर, एक इसम जखमी झाल्याची घटना सिरेगाव सानगडी मार्गावरील केसलवाडा फाट्याजवळ आज दि.०६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:०० दरम्यान घडली. मृतकाचे नाव सुरेश भिकाजी संग्रामे रा. टोला सिरेगाव असे आहे. तर,नथू गायकवाड असे जखमी इसमाचे नाव आहे. मृतकाच्या वरच्या खिशात असलेला मोबाईलचा स्फोट झाला त्यामुळे कपडे जळून छातीच्या काही भाग जळाल्याने दिसून येत आहे. दरम्यान, त्याच वेळी त्याचा मृत्यू झाला. सोबत दुचाकी वर मागे बसून असलेले त्याचे भाऊ नथू गायकवाड गाडीवरून पडल्याने, किरकोळ जखमी असून अत्यावस्थेत आहेत.त्यांना भंडाऱ्याला हलवण्यात आले आहे. आज ता.०६ रोजी सानगडी येथे आठवडी बाजार होता. दोघेही मिळून बाजारासाठी गेले असता, बाजार करून परत आपल्या मूळ गावी सिरेगाव टोला जात होते. अचानक खिशामध्ये असलेला मोबाईल स्फोट होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. ते एक शिक्षक होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)