हद्दपार.. आरोपी घरीच सापडला.!

Shabd Sandesh
0
देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत केली कारवाई..
शब्द संदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.२१ डिसेंबर २०२४

     देवरी शहरातील राजेश उर्फ राज सुदर्शन भारती वय (४२) वर्ष रा. मस्कऱ्या चौक, देवरी येथे आरोपी यास दि.६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ)(ब) अनन्वये उपविभागतील तालुका देवरी, आमगाव,सालेकसा या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते. दि.२० डिसेंबर २०२४ ला ३:०० वाजे दरम्यान आरोपी हा यास हद्दपार करण्यात आले असून,सुद्धा तो हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून देवरी येथील स्वतःच्या घरी येऊन चेंगळ करतानी मिळून आल्याने, पोलीस स्टेशन देवरी येथे अप क्र. ४३४/२०२४ कलम १४२ मकोपा अननवे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोहवा. हिवराज परसमोडे,विशाल खांडेकर करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)