ट्रॅक्टर उलटल्याने,महिला शेतकरी जागीच ठार

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
 भंडारा, दि.२२ डिसेंबर२०२४
    
      गोबरवाई पोलीस ठाणे अंतर्गत लोभी येथील घटना..

    गोबरवाही पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या लोभी येथील शेत शिवारात ट्रॅक्टर उलटल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा दबून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५:१५ वाजताच्या सुमारास लोबी शिवारात घडली. हेमलता बळीराम देशमुख असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृताचे पती बळीराम देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
   लोभी शेत शिवारात उन्हाळी धानाची लागवड करण्यासाठी ट्रॅक्टरने पती-पत्नी दोघेही गेले होते. लागवड झाल्यानंतर ट्रॅक्टर वर बसून पांदण रस्त्याने घराकडे जात असताना, ट्रॅक्टरच्या ब्रेक लॉक न करता हयगयीने ब्रेक लावला. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याखाली जयराम देशमुख यांच्या शेतात उलटला. त्यात ट्रॅक्टरचा इंजिन खाली हेमलता देशमुख यांच्या दबून मृत्यू झाला. शेषराव देशमुख यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिसांनी बळीराम देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)