दुचाकीची अमोरासमोर धडक;तीन जण जखमी

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.०३

    देवरी-आमगाव मुख्य मार्गावरील शासकीय आयटीआय देवरी जवळील घटना
देवरी येथून ०१ किलोमीटर असलेल्या देवरी आमगाव मुख्य रस्त्यावरील शासकीय आयटीआय जवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ३ जण  गंभीर जखमी झाल्याची घटना ०३ डिसेंबर २०२४ रोजी सायं.६:०० वाजताच्या दरम्यान घडली.            
      सलमान एजाज खान(२७) रा.अमरावती,श्याम आनंद कुरसुंगे (२६) रा.गोंदिया,सौरभ राजेंद्र येलके (२५) रा.जांभोरा गोंदिया हे तिघेही गंभीर जखमी झाले. सलमान एजाज खान चटईचा व्यवसाय करून देवरी येथे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच २७ डी.एन.९६१५ ने येत होता. तर सौरभ यलके, श्याम  कुरसूगे हे दोघे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम.एच.३५ ए.पी.४४९७ ने देवरी वरून आमगाव कडे जात असताना, दोन्ही दुचाकीची शासकीय आयटीआय देवरी नजिक जोरदार धडक झाली. यात तीघेही जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींना गंभीर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)