डिजिटल मीडियावर निमंत्रण पत्रिकेचा ट्रेंड;तरुणाईची पसंती
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.१६ डिसेंबर २०२४
शुभ कार्य निमंत्रण पत्रिका छापून वाटप करण्याऐवजी मोबाईलवर पत्रिका पाठविण्याचा ट्रेड जोरात सुरू आहे. तरुणाईची याला पसंती दिसत आहे.शहरात गावोगावी जाऊन लग्न पत्रिका वितरित करावी लागत होती. त्यापेक्षा आता मोबाईल द्वारे व्हाट्सअप च्या माध्यमातून शुभविवाहाचे तसेच शुभकार्याचे निमंत्रण डिजिटल पद्धतीने देणे सुरू झाल्याने वेळ व पैशाची बचत होत आहे.
शुभकार्यातील समारंभाचे वेडिंग मार्केट झपाट्याने पसरत असल्यामुळे, मोबाईलद्वारे ऑनलाईन निमंत्रण देण्याला चांगलेच महत्त्व आले आहे. सोशल साईटवर डिजिटल लग्नपत्रिका पाठविण्याचे अनेक प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे लिखित पत्रिकेऐवजी थेट डिजिटल स्वरूपातील निमंत्रण तरुणाईला अधिक जवळचे वाटते. आता निमंत्रण पत्रिका छापून वाटण्याएवजी मोबाईलवर पत्रिका पाठविण्याचा ट्रेंड जोरात आहे. पूर्वी घरोघरी आणि गावोगावी जाऊन लग्न पत्रिका वाटप करावी लागत होती लग्नाचे दिवस जवळ येतात कोणाकडे निमंत्रण पत्रिका पोचवली नाही याची चिंता आता डिजिटल युगात मोबाईल क्रांतीमुळे मिटली आहे. लग्नाची भरपूर प्रमाणात लग्न पत्रिका छापून त्यापैकी शहरात ग्रामीण भागात नातेवाईकांना पाहुण्यापर्यंत पत्रिका पोहोचविण्याचा अट्टाहास कमी झाला आहे. शुभकार्यातील धुमधडाक्यात होणाऱ्या लग्न समारंभाच्या महत्त्वाच्या एक भाग म्हणजे लग्नाच्या पत्रिका छापने आणि समाजात नातेवाईक व मित्रमंडळींना वाटप करणे हा आहे. मात्र स्वतः घरी जाऊन पत्रिका वाटप करण्याची प्रथा मागे पडू लागली आहे. शुभकार्य डिजिटल मीडियाच्या पत्रिका आता पाठवल्या जाऊ लागले आहेत. अशा पद्धतीने मोबाईल वरून मिळालेले आमंत्रण स्वीकारले जाऊ लागले आहे.
वेळ आणि पैशाची ही बचत..
सध्याचे युग धावपळीचे झाले आहे. लग्न पत्रिका पाठविण्यासाठी पुष्कळ कालावधी तसेच पैसेही लागत असते. लग्न पत्रिका देण्यासाठी जाताना अनेकदा अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याच्याही घटना घडत आहेत. त्या मानाने व्हाट्सअप वर पत्रिका पाठवल्यास वेळ आणि पैशाची बचत होऊ लागली आहे.