अनेक शेतकरी ई-पीक पाहणी पासून वंचित

Shabd Sandesh
0
   शब्द संदेश न्यूज नेटवर्क,
   देवरी, दि.०७
खरीप हंगामात शेतात घेतलेल्या पिकांची ऑनलाईन नोंदणी शासनाने बंधनकारक केली आहे. परंतु जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी इ-पिक पाहणी कडे दुर्लक्ष केल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे.त्यामुळे शासकीय हमीभाव केंद्रावर धान्य विक्रीसाठी तसेच शासनाने नुकतेच घोषित केलेले हेक्टरी २५ हजाराच्या बोनसच्या लाभासाठी वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
  जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात इ-पिक पाहणी केली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी नोंदणी करताना अडचणी येत आहेत. धान विक्री नोंदणीसाठी सातबारावर खरीप हंगामातील पिकांची नोंदणी तलाठाच्या सातबारावर असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास तलाठ्याकडून पीक पेऱ्यावर तसे नोंद दिसून येत नाही. तसे प्रमाणपत्र मिळण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. 
  राज्य शासनाने नुकतेच सरसकट हेक्‍टरी २५ हजार रुपयाच्या बोनस जाहीर केला आहे. यामध्ये खरेदी केंद्रावर धनाची विक्री करण्याची कोणतीही अट टाकण्यात आलेली नाही. नोंदणी केली तरी बोनस दिला जाणार आहे.त्या करिता शेतकरी नोंदणीसाठी धावपळ करीत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)