मौजा बेलारगोंदी येथे मृदा दिवस साजरा

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
 देवरी,दि.०५ डिसेंबर २०२४
दि.०५ डिसेंबर २०२४ रोज गुरुवारला जागतिक मृदा दिन कार्यक्रम मौजा बेलारगोंदी समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आला.
    यामध्ये तालुका कृषी अधिकारी के.के.बडोले मॅडम तसेच एन.पी.असाटी सहाय्यक प्राध्यापक हिराटोला,रामभाऊ हटवार पो.पा.शेडेपार, संगीताबाई गावड ग्रा.प. सदस्या, प्रगतशील शेतकरी मधुकर चाकाटे, बाबुरावजी गावड माजी सरपंच, उत्तम लांजेवार, सहेली महिला बचत गटाच्या सर्व महिला, संगीताताई लांजेवार, सोनूताई निखाडे,उपस्थित होत्या. 
  यात प्रा.असाटी सर यांनी माती नमुने कसे घ्यावे.व जमीन आरोग्य पत्रिकेनुसार त्याचे महत्तव,तालुका कृषी अधिकारी के.के.बडोले मॅडम यांनी कृषि विभागाच्या सर्व योजनाची माहिती दिली.यामध्ये बि.टी.एम. श्री वाय.एन शेख, बी.बी जांभुळकर कृषि सहाय्यक,कृषि सखी रंजना सरजारे तसेच शेडेपार व बेलारगोंदी येथिल भरपूर संख्येने शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)