पाच रुपयाच्या पाऊचमधील खेळणीने घेतले,चिमुकल्याचे प्राण..

Shabd Sandesh
0
गंगाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत, सोनेगाव येथील घटना..
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
गोंदिया, दि.१७ डिसेंबर २०२४

   गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या ग्राम सोनेगाव येथे कुरकुरेच्या पाऊच मध्ये येणारी खेळणी गळ्यात अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे घटना १६ डिसेंबर रोजी दुपार दरम्यानची आहे. शिवांश उमेश लांजेवार(८) असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे सोनेगावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 
   सविस्तर जसे की, गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक स्तराच्या व्यापाराकडून चिमुकल्यांच्या आनंदासाठी खेळणी असलेले कुरकुरीत पाऊच तयार केले जात आहेत. गावपाड्यातील लहान सहान दुकानात कुरकुर्‍याचे पाऊच सहजपणे उपलब्ध होत आहेत. चिमुकल्याच्या हाती रुपये दोन रुपये आले की, प्रत्येक चिमुकला दुकानात जाऊन खेळणे असलेले कुरकुलेचे पाऊच घेऊन आनंद लुटत असतो. त्यातूनच आज सोनेगाव येथे येथे दुर्दैवी घटना घडली. 
वर्ग दुसरी मध्ये शिक्षण घेत असलेला शिवांश उमेश लांजेवार यांनी कुरकुर्‍याची पाऊच घेतले. त्यामध्ये त्याला छोटीशी प्लास्टिकची खेळणी मिळाली. खेळता खेळता शिवांशने तोंडात घातले.गळ्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोनेगावात एकच शोककळा पसरले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)