वांगी,गवार,भोपळा,लसणाचे भाव अवाक्याबाहेर...
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.०५
हिवाळा सुरू होताच, तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ताज्या भाज्या खायला मिळतात. हिवाळ्यात,उन्हाळा आणि पावसाळा ऋतूपेक्षा भाजीपाला स्वस्त मिळतो. परंतु,यंदा हिवाळा सुरू होऊनहीं, महिना संपत आला तरी, अद्यापही आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव वाढलेले दिसून येत आहेत. आठवड्याला भाजीपाल्यासाठी कमालीचा खर्च करावा लागत असून, चारशे रुपये खर्च केलेही आठवडाभराचा भाजीपाला येईना अशी वस्तुस्थिती आहे.
थंडीने बदललेल्या वातावरणाचा भाजीपाल्यावर परिणाम होत असल्याने, काही प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी हिवाळा लागूनहीं सर्वसामान्यांच्या आवडीच्या भाज्या स्वस्तात मिळत नसल्याने, महागाईमुळे त्या ताटातून गायब झाले आहेत. हिवाळा लागतात अनेक पालेभाज्या शेतशिवारातील रानभाज्या ताटात दिसतात, मात्र यावर्षी डिसेंबर महिन्यातही भाजीपाल्याचे दर वधरलेले दिसून येत आहेत.
काही दिवसात नवीन भाजीपाला येईल तोपर्यंत, सामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. व्यापारी मोठा नफा कमवत आहेत.मात्र शेतकरी तोट्यात आहेत.