अत्याचार प्रकरणातील अखेर.. आरोपीची न्यायालयात रवानगी.!

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
अर्जुनी मोरगाव,दि.२२ डिसेंबर २०२४

     अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मुंगली येथे ७ डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर नराधमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची फिर्याद नोंद होताच नवेगाव बांध पोलिसांनी आरोपी रजनीकांत कमलदास वालदे(३६) याला तूर्त अटक केली. दरम्यान न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली.
   नवेगाव बांध पोलीस ठाणे अंतर्गत मूंगली येथे मैत्रिणी सोबत खेळत असलेल्या ९ वर्षीय मुलीला आरोपी रजनीकांत वालदे यांनी घरी नेले. दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. यावर पीडित मुलीने प्रतिकार करीत आरोपीच्या हाताचा चावा घेत दाराची कळी काढून घटनास्थळावरून पळ काढला.या प्रकरणामुळे घाबरलेल्या मुलीने कुणालाही याची माहिती दिली नाही.मात्र तिच्या हालचालीवरून कुटुंबीयांनी तिच्याकडून माहिती घेतली असता,१९ डिसेंबर रोजी प्रकरणाचा उलगडा झाला. दरम्यान नवेगाव बांध पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम ७६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ०८,१२ बाल.अ.प्र.का.२०१२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.पोनी. योगिता चापले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला तूर्त अटक केली. अटकेनंतर आरोपी रजनीकांत वालदे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोना. वैशाली घनमारे करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)