शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि. १२
अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने पंचायत समिती देवरी अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगांव येथे बुधवार,दि.११ डिसेंबर २०२४ ला केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन कल्पनाताई वालोदे यांनी सविताताई पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
कार्यक्रमाच्या सह उद्घाटक स्थानावर हजर असलेल्या अनिल बिसेन उपसभापती पं. स. देवरी यांनी हजर असलेल्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात निरोगी आरोग्यासाठी खेळ आणि व्यायाम हा मूलमंत्र असल्याचे सांगितले. खेळाडूंना प्रोत्साहित करीत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ममता अंबादे पंचायत समिती सदस्य,अंजुताई बिसेन सरपंच वडेगांव, सरिताताई रहांगडाले माजी जिल्हा परिषद सदस्या,जी.टी. सिंगनजुडे गटविकास अधिकारी, एम.एस. मोटघरे गटशिक्षणाधिकारी, एस.जी. वाघमारे शिक्षण विस्तार अधिकारी, एच.जी. राऊत शिक्षण विस्तार अधिकारी, डि.टी. लाळे केंद्रप्रमुख लोहारा, सुभाष करचाल अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, ललिता देसाई अध्यक्ष माता पालक समिती, ललिता भुते पोलिस पाटील वडेगांव, राजकुमार रहांगडाले अध्यक्ष तंटा मुक्ती समिती, डी. एन. बावने ग्रामविकास अधिकारी, मनोहर राऊत माजी सरपंच, छत्रपाल राऊत माजी सरपंच, अविनाश टेंभरे माजी अध्यक्ष तंटा मुक्ती समिती, रमेश बागडे, भोजराज चाकाटे सर, संजय अंबुले सर, धनराज पटले, शैलेंद्र फुंडे, दिलीप फुंडे, चंद्रप्रकाश बिसेन, संजय देसाई, हेमराज बिसेन, रामकिशोर रहांगडाले, गणेश चाकाटे, रामेश्वर देसाई, सदाशिव करचाल, गजानन जमखेडे, सुनिल बिसेन, विजय बिसेन, विनोद बिसेन, प्रेमजी राऊत व लोहारा केंद्रातील सर्व गावकरी उपस्थितीत होते.