शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.१६ डिसेंबर २०२४
देवरी तालुक्यातील ग्राम डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर १६ डिसेंबर पासुन रौप्य महोत्सव निमित्त शालेय क्रिडा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम तसेच उद्घाटक,ग्राम विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शार्दुल मेश्राम, कोषाध्यक्ष पौर्णिमा मेश्राम,लक्ष्मण नाईक माजी सरपंच डवकी यांच्या हस्ते क्रिडासत्राचे लालफित कापुन उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक जागेश ठवरे, विकास पटले,नरेश निखारे, प्रकाश लांजेवार,प्रा.योगेंद्र बोरकर,प्रा.धर्मेंद्र भोवते,मुकेश टेंभरे,भूपेश कुलसुंगे,अर्चना मारबते,रविकुमार कोरे,ममता टेंभूरनिकर,सुषमा जवंजार, सरिता मेश्राम,कृष्णकुमार गौतम, गणेश डोंगरे सुबोध देशपांडे तसेच शालेय विद्यार्थी,शिक्षकेत्तर कर्मचारी, गावकरी हजर होते.