शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
साकोली, दि.१३ डिसेंबर २०२४
साकोली बस स्थानकाच्या समोर इलेक्ट्रिक गाडीवर तीन मित्र जात असताना, ट्रॅक्टरच्या मागील भाग डोक्याला घासून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता उघडकीस आली आहे.भावेश नारायण ब्राह्मणकर असे मृत्य विद्यार्थ्याचे नाव असून, चीचटोला पळसगाव येथील रहिवासी आहे.
भावेश ब्राह्मणकर(१९) हा इलेक्ट्रिक गाडी डेल्टीकनने दोन मित्रांसोबत बस स्थानकाच्या समोरून जात असताना, ट्रॅक्टर क्र.३६ बी ९४५४ या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा मागील भाग भावेश च्या डोक्याला स्पर्शून गेल्याने, डोक्याला जबर मार लागला.त्यातच त्याचा घटनास्थळीस मृत्यू झाला. त्याचे इतर दोन मित्र हे मात्र सुखरूप असून त्यांना कुठलीही जखम झाली नाही. भावेश साकोली येथील करंजकर कॉलेजमध्ये बी फार्मच्या प्रथम वर्षाला शिकत होता.
त्याला आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी साकोली उपजिल्हा रुग्णालयात भावेश यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन पोस्टमार्टम लवकर करण्यासाठी डॉक्टरांशी हितगुज केली. या अपघाताचा तपास पोलीस हवालदार प्रमोद बागडे यांच्याकडे आहे.