देवरी, दि.१२डिसेंबर २०२४
देवरी येथील बँक ऑफ इंडिया च्या वतीने ग्राम मुल्ला येथे कल्पनाताई बागडे सरपंच ग्रा.पं. मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चलन व्यवस्थापन, चलनी नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये आणि नोट परतावा नियमांबद्दल जागरूकता पसरवणे, महिला बचत गटाचे खाते उघडणे, एटीएम कार्ड ची सुविधा करून देणे, बँक खात्याची केवायसी विषयी माहिती देणे, बचत खात्याची माहिती देणे,याविषयी कार्यक्रम आयोजित केला होता.
बँकेचे कर्मचारी सुनंदाताई बहेकार,पाल सर, रुपेश डोये सर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात प्रभाताई वंजारी, सुरेखाताई शहारे, कांताताई कांबळे, सुनीताताई, मंदिराताई बडगे, दिक्षाताई नागदेवे, किरणताई कांबळे, पापमाताई बोरकर, शेवंताबाई चनाप, मनोरमा डोंगरे, धुरपता कांबळे, सविता मेश्राम तसेच सामान्य लोकांचा सक्रिय सहभाग लाभला.