जांब येथे वाघाने केली डुकराची शिकार;परिसरात भीतीचे वातावरण

Shabd Sandesh
0
कांद्री वनविभागापुढे वाघाला जेरबंद करण्याचे आव्हान...

शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
मोहाडी, दि.१४ डिसेंबर २०२४
      
      मोहाडी तालुक्यातील येत असलेल्या कांद्री वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या अनेक गावातील परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील अनेक दिवसापासून वाघाने अनेक शिकारी केलेले आहेत चार डिसेंबरला पिटेसूर येथील इसम मासेमारी करण्याकरिता गेला असता जंगलामध्ये त्याने त्याची शिकार केली होती. ती घटना ताजीच असताना,दि.१२ डिसेंबरला सोरणा येथील रहिवाशांचे गाय आणि म्हशीचे वाघाने शिकार केली होती. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच जांब-लोहारा मार्गावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाघाने केलेल्या डुकराची शिकार आढळून आली. वाघाने डुकराला शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये शिकार करून शेतामधील असलेल्या बोरवेल जवळ आणून ठेवले असे आढळून आले. 
 ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये शिकार केलेला डुक्कर आढळून आला तो शेतकरी शेतात गेला असता, डुक्कर छिन्न विच्छिन्न अवस्थेत दिसून आला. डुकराच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. त्याच्यावरून असे आढळून येते की,ती शिकार वाघानेच केली असावी. त्यामुळे त्या शेतकऱ्याने घटनेची माहिती वन विभाग कार्यालय कांद्री या ठिकाणी देण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच तेथील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी घटनांच्या ठिकाणी पाहणी केली. परंतु, त्या ठिकाणी वाघाचे पगमार्क आढळून आले नाही. कारण ती जागा टणक आणि वाळलेली असल्यामुळे शिकार वाघानेच केली असेल .असा अंदाज आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)