जयपूर अजमेर महामार्गावरील घटना..
शब्द संदेश न्यूज नेटवर्क,
जयपूर, दि.२१
सीएनजी टँकर मागे घेताना, ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण स्फोटात किमान ९ जण मरण पावले तर ३७ जण जखमी झाले. जयपूर अजमेर महामार्ग शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण स्फोटात आणखी ४० वाहने जळून खाक झाली. जखमी मध्ये १५ हून अधिक जण अस्थव्यस्त आहेत. भांरोटा येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या समोरच अपघात झाला. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे.
सीएनजी घेऊन जाणाऱ्या टँकरला ट्रकची धडक बसल्यानंतर गॅस सर्वत्र पसरला त्यानंतर त्याने पेट घेतल्याने स्फोटाची तीव्रता वाढली खाक झालेल्या वाहनांमध्ये २९ ट्रक, पाच मोटार,तीन बस, दोन मोटरसायकल व एका ऑटो रिक्षाचा समावेश आहे. अपघातानंतर सुमारे २०० मीटर परिसरात गॅस पसरला. धडक झाल्यानंतर लगेच पोट झाला सुमारे १८ टन गॅस या टँकर मध्ये होता. त्याच्या स्फोटात सुमारे ४० वाहने सापडली. घडलेली घटना इतकी भयानक होती की संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान सहायता निधी मधून मृतांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना ५० हजाराची मदत जाहीर केली आहे.