"डिजिटल क्रेज" मध्ये झपाट्याने होताहे वाढ..
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी,१४ डिसेंबर २०२४
गुगल पे, पेटीएम सह अन्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मने भरणा करण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. अनेक जण खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला रोख न देता विविध माध्यमातून ऑनलाईन भरणा करतात. नागरिक या पद्धतीला स्वतःसाठी सोपे आणि आरामदायक समजतात. त्यामुळे आज एटीएम व बँकेतून रोकड काढणाऱ्यांची संख्या घटली आहे.
ज्या एटीएम वर रोकड काढणाऱ्यांची संख्या घटली आहेत. अशा ठिकाणची एटीएम बॅंका बंद करीत आहेत. आज अनेक ठिकाणी बंद शटर किंवा त्या जागेवर अन्य दुकाने उघडल्याचे दिसत आहेत. छोट्या खरेदीसाठी ही कॅश ऐवजी ऑनलाइन पेमेंटचा वापर केला जात आहे. आता लोक तेजीने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानासह पुढे वाटचाल करीत आहे. त्यांची आता एटीएम किंवा बँकेत जाऊन वेळेच्या अपव्यय करण्याची इच्छा नाही. बँकेच्या दृष्टीने ही एटीएम ची संख्या घटत आहे. मोबाईलच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी लोकांनी वेगवेगळे प्लॅटफॉर्म डाऊनलोड करून ठेवले आहे. भीम आप, गुगल पे, पेटीएम, फोन पे आधीचा त्यात समावेश आहे. यूपीआय अंतर्गत हे सर्व प्लॅटफॉर्म येतात.अशा माध्यमातून पेमेंट केल्यास पैसे हरविण्याची भीती नसते.
तसेच खिसे कापूचिही भीती राहत नाही. पूर्वी जे लोक दोन ते तीन दिवसात एटीएम मध्ये जात होते ते आता महिन्यात एखाद्या वेळेस जात असतात. त्यामुळेच सहरासह ग्रामीण भागातही एटीएम ची संख्या कमी झाली आहे.
बँकाची होते आर्थिक बचत
डिजिटल पेमेंट मुळे बँकांना सुविधा झाली आहे .यामुळे बँकेत येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच बँकेला एटीएम वर प्रत्येक महिन्याला 50 ते 60 हजार रुपये खर्च करावा लागत होता. दहा ते पंधरा हजार रुपये भाड्याने दुकान घ्यावे लागत होते.बारा बारा हजार रुपयांचे गार्ड तसेच मशीन मध्ये पैसा भरणे तसेच विजेच्या बिलावर १० हजार रुपये खर्च होते. आता काही एटीएम बंद झाल्याने बँकेच्या पैशाची बचत होत आहे.