शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
अरविंद उके देवरी, दि.०३
आज दि.०३ डिसेंबर २०२४ ला समाज मंदिर शेडेपार येथे कृषी विभागाची बैठक बालक जांभूळकर कृषी सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली शेडेपार व बिलारगोंदी येथिल ग्राम संघ, महिला बचत गटाचे महिला सभासद उपस्थितीत पार पडली.
यामध्ये कृषी विभागातील कृषी सर्व योजनाची जसे केंद्र शासनाची प्रक्रिया उद्योग pmfme योजना.,महाडीबीटी वरील कृषी औजारे,वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन,पी. एम. किसान सन्मान निधी के.वाय.सि. तसेच आधार सिडींग पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांना वाचन व माहिती दिली.
यात बैठकीला महिला बचत गटाचे संगीताताई लांजेवार, कृषी सखी रंजनाताई सरजारे, सोनूताई निखाडे, ग्राम महिला संघाचे ईतर पदाधिकारी व महिला बचत गटाचे महिला उपस्थित होते.