देवरी, दी.१२
देवरी येथील वेगवेगळ्या विभागातील शिकाऊ प्रशिक्षणार्थानी दि.१० डिसेंबर २०२४ ला योजनेची मुदत वाढ तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यावेतन वाढ करिता,आमगाव देवरी विधानसभा चे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सर्व शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून,देवरी विभागातील शासकीय आस्थापना,शैक्षणिक संस्था, मनपा व इतर कार्यालयात विविध विभागांमध्ये विशिष्ट पदावर निवड करण्यात आली आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या उपक्रमाद्वारे आपल्या मतदार संघातील काही बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळालेली आहे. शासकीय कामाचा पूर्ण अनुभव व मार्गदर्शन प्रशिक्षणाद्वारे सर्व प्रशिक्षणार्थींना मिळत आहे. त्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिलेले विद्यावेतन योग्य वेळेत मिळत आहे. परंतु, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाची कालावधी फेब्रुवारी मार्च-२०२५ पर्यंत पूर्ण होत असल्याने, त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगारीच्या छायेत वावरत आहेत.
सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या शासनामार्फत सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ची प्रशिक्षणार्थीची कालावधीमध्ये मुदतवाढ तसेच विद्यावेतन मध्ये वाढ करण्यात यावी. असे प्रलंबित असणाऱ्या प्रशिक्षणाची मागणी सरकारकडून आपल्या माध्यमातून मंजूर करण्यात यावी. करिता देवरी विभागातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांनी आमगाव देवरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांना निवेदन दिले आहे.