गोंदिया,दि. ०२ डिसेंबर २०२४
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय गोंदिया येथील दहा मीटर शूटिंग रेंजवर प्रशिक्षक श्री. निलेश शेंडे यांचे मार्गदर्शनात सराव करीत असलेले खेळाडू-
कु. ओजल मनोज चुटे वय १४ वर्षे हीने १४ वर्षाखालील वयोगटात दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये सुवर्ण पदक व सुजल आदित्य अग्रवाल वय १७ वर्षे याने दहा मीटर रायफल प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले असून दोघांचीही राज्यस्तरावर निवड झालेली आहे.पुढील राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबाद येथे होणार आहे.
पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, प्रभारी पोलीस उप अधीक्षक, (गृह) नंदिनी चानपुरकर, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा दिनेश लबडे, रापोनि.पो.मुख्या.गोंदिया रमेश चाकाटे यांनी यश प्राप्त करणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे त्यांच्या पुढील उज्वल भवितव्याकरीता शुभेछ्या दिल्या आहेत.त्याचप्रमाणे शूटिंगचे प्रशिक्षक निलेश शेंडे (NIS Shooting coach) यांचे विशेष अभिनंदन केले आहे.