कोहमारा नवेगाव/बांध मुख्य मार्गावरील कोकणा/जमी. फाट्यावरील घटना
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
सडक अर्जुनी, दि.१८ डिसेंबर २०२४
ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ डिसेंबरला दुपारी अंदाजे १२:०० वाजे दरम्यान कोहमारा ते नवेगाव/बांध मार्गावरील कोकणा/जमी.फाट्याजवळ घडली. गुलचंद्र वखारे (२२) व दिनेश कापगते (१९) दोन्ही राह. कोकणा/जमी. ता. सडक अर्जुनी अशी जखमींची नावे आहेत.
सविस्तर असे की, सदर व्यक्ती ही आपले दुचाकी घेऊन कोकणा/जमी. फाट्यावरील एका पानठेल्याजवळ थांबले असताना, कोहमारा कडून नवेगावबांध कडे जात असलेला ट्रॅक्टर क्र. एम.एच.३५ ए.जी.४९९५ वरील चालक लापरवाही व निष्काळजीपणे चालवून थांबलेल्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत दोन्ही इसम गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नवेगाव/बांध येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता गोंदिया येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डूग्गीपार पोलीस ठाणे अंतर्गत ट्रॅक्टर चालकाविरुध्द अप क्र.४६२/२०२४ कलम २८१,१२५ ए.बी. भारतीय न्याय संहिता अनन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरील तपास पोह. गुणवंत कठाणे करीत आहे.