भरधाव ट्रेलरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू;पती गंभीर जखमी

Shabd Sandesh
0
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी येथील घटना
   तुमसर दि.०२ डिसेंबर 2024 
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
   तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी देव्हाडी रोडवर दि.०१ डिसेंबर २०२४ रविवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास भरधाव ट्रेलर ने धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.
     फिर्यादी अरुण कुमार भिकराम रहांगडाले (४९) राह. सीतेपार ता. तिरोडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ बामचंद रहांगडाले आणि त्याची पत्नी वैशाली रहांगडाले(३५) हे दोघेजण मोटरसायकल क्रमांक एम.एच. ३५ ए.एफ.५०४५ ने तिरोड्यावरून तुमसर कडे डॉक्टर कडे जात होते. माडगी येथे पावर हाऊस नजीक रस्त्याने मागून येणाऱ्या भरधाव ट्रेलर क्र.४०/सी. एम.८९२८ ने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात वैशाली रहांगडाले यांच्या जागीच मृत्यू झाला तर, बामचंद राहंगडाले यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमींना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पोलीस स्टेशन तुमसर येथे ट्रेलर चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम,२८१,१२५(अ),१२५(ब),१०६(१) बीएनएस सह कलम १८४ मोटरवाहन कायद्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)